शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजना आज सुरू होणार? सहा कोटींचा टंचाई निधी योजनेकडे वर्ग : कारखानदारांकडून ४ कोटींची पाणीपट्टी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:49 IST

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. आता राज्य शासनाकडून टेंभू योजनेचा ६ कोटी इतका टंचाई निधी जमा झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ही रक्कम टेंभू योजनेकडे वर्ग झाली आहे. यामुळे योजना गुरूवारीच सुरू होण्याची शक्यता आहे.

योजनेसाठी केन अ‍ॅग्रो रायगाव कारखान्याकडून २ कोटी, ग्रीन पॉवर गोपूजकडून ७५ लाख, सोनहिरा वांगीकडून ५० लाख व अन्य जमा, असे एकंदरीत ४ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम तातडीने महावितरणकडे भरून वीजपुरवठा पूर्ववत जोडून गुरुवारी टेंभू योजना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

चालूवर्षी टेंभू योजनेचे पहिले आवर्तन मिळण्यास विलंब झाल्याने लाभक्षेत्रातील शेतीपिके कोमेजून चालली आहेत. अशा परिस्थितीत आता टेंभू योजना सुरू होत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती पिकास जीवदान मिळणार आहे. राज्य शासनाकडे सिंचन योजनांचा टंचाई उपाय योजना निधी अडकला होता. हा निधी मिळविण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर आदी नेत्यांनी पाठपुरावा केला.

आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केन अ‍ॅग्रो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ग्रीन पॉवर या कारखान्यांच्या माध्यमातून टेंभू योजनेची शेतकºयांच्या ऊसबिलातून वसूल झालेली पाणीपट्टी भरली आहे. त्यामुळे आता टंचाई निधी आणि कारखान्यांकडून वसूल झालेली पाणीपट्टी अशी १० कोटींची रक्कम वीजबिल थकबाकीपोटी तात्काळ भरली जाणार आहे आणि टेंभू योजनाही तत्काळ सुरू केली जाणार आहे.तिन्ही योजनांसाठी १४ कोटी वर्गटेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही योजनांचा एकंदरीत १४ कोटी इतका टंचाई उपाय योजना निधी राज्य शासनाकडून वर्ग झाला आहे. यामध्ये टेंभू योजनेचा ६ कोटी, म्हैसाळ योजनेचा ५ कोटी ५० लाख, तर ताकारी योजनेचा २ कोटी ५० लाख इतका टंचाई उपाय योजना निधी आहे. हा निधी वर्ग झाल्यामुळे योजनांची वीजबिल थकबाकी भरण्यास मदत झाली आहे.आवर्तनासाठी यंत्रणा सज्जयोजना सुरू करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत. वीजपुरवठा पूर्ववत जोडताच टेंभू योजना सुरू होईल. आवर्तनासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहे. महावितरणकडून सर्वतोपरी सहकार्याची गरज आहे, असे टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली